Bread Ball Recipe: थंडीच्या दिवसात जर तुम्हाला चटपटीत आणि गरमागरम काय खायचं असेल तर ब्रेड बॉल्स हा उत्तम स्नॅक आहे.बनवायला सोपी आणि कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे.सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये ही हे तुम्ही देऊ शकता. चला तर नाग आज जाणून घेऊया ही रेसिपी कशी बनवायची ते.
साहित्य
ब्रेड
उकडलेले बटाटे – ३
हिरवी मिरची पेस्ट – १ चमचा
आले पेस्ट – १ चमचा
मीठ चवीनुसार
हळद – पाव चमचा
चिमूटभर हिंग
मोहरी – अर्धा चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
कृती
ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्मॅश करून घ्या. आणि त्यात मीठ, हिरवी मिरची आणि आले मिक्स करा. यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळद टाकून गॅस बंद करून नंतर त्यात बटाटे व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्या. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे म्हणजेच बॉल्स बनवा. आता ब्रेड स्लाइसची कड कापल्यानंतर पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढा आणि हलक्या हातांनी पिळून घ्या.आणि बटाट्याच्या गोळ्याला दोन्ही बाजूंनी कव्हर करा. आता कढईत तेल गरम करून ब्रेड बॉल्स सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले गरमागरम आणि क्रिस्पी ब्रेड बॉल्स टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.


next post