Tarun Bharat

इम्रान यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न

Advertisements

कर्मचारी ठेवत होता हेरगिरीचे उपकरण ः सुरक्षा पथकाने घेतले ताब्यात

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवांदरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बानी गालाचा एक कर्मचारी इम्रान यांच्या कक्षात एक हेरगिरी उपकरण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. या कर्मचाऱयाला माजी पंतप्रधानांच्या बेडरुममध्ये उपकरण ठेवण्यासाठी पैसे देण्यात आले होते. परंतु दुसऱया कर्मचाऱयाने याची माहिती सुरक्षा पथकादा दिली होती.

बानी गाला सुरक्षा पथकाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर पाळत ठेवण्याच्या प्रयत्नाची माहिती मिळाल्यावर कर्मचाऱयाला ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा पथकाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्याच्या अफवांदरम्यान ही घटना समोर आली आहे. यापूर्वी कथित धोका पाहता बानी गालाच्या परिसरात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले हेते.

यासंबंधी सरकार समवेत सर्व संबंधित यंत्रणांना कळविले आहे. संबंधित कर्मचारी माजी पंतप्रधानांच्या बेडरुमची सफाई करत होता. त्याला हेरगिरीचे उपकरण ठेवण्यासाठी पैसे देण्यात आले होते. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे पीटीआय नेते शाहबाज गिल यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा पीटीआयच्या अनेक नेत्यांनी केला आहे. इम्रान खान यांनीही स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात केरळच्या महिलेचा मृत्यू

Patil_p

कमला हॅरिस यांनी घेतली लस

Omkar B

ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा

datta jadhav

ब्रिटन जलवायू बदल मुद्यावर आर्थिक मदत देण्याचे संकेत

Patil_p

इजिप्त : 347 नवे रुग्ण

Patil_p

स्पेनमध्ये 4 सिंह कोरोनाने आजारी

Omkar B
error: Content is protected !!