Tarun Bharat

सित्सिपस-कोरिक अंतिम लढत

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स वेस्टर्न आणि सदर्न खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीसच्या स्टिफानोस सित्सिपसने रशियाच्या टॉप सिडेड मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का देत एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकने ब्रिटनच्या नुरीचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला. सित्सिपस आणि कोरिक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सित्सिपसने मेदव्हेदेवचा 7-6 (8-6), 3-6, 6-3 असा पराभव केला. हा सामना अडीच तास चालला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात क्रोएशियाच्या कोरिकने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचे आव्हान 90 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 6-4 असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. क्रोएशियाच्या कोरिकने एटीपी टूरवर दुसऱयांदा मास्टर्स 1000 स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.

Related Stories

युपी योद्धा संघाचा सलग तिसरा विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी विजय

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सची केकेआरवर मात

Patil_p

इंग्लंडकडून टी-20 मालिकेत लंकेचा ‘व्हॉईटवॉश’

Patil_p

भारतीय संघाला 60 टक्के दंड

Patil_p

रणजी स्पर्धेची 87 वर्षांची परंपरा खंडित

Patil_p