Tarun Bharat

जिल्हय़ात 6 हजार हेक्टरात हळद लागवड

Advertisements

गोकाक, चिकोडी, रायबाग तालुक्मयात प्रमाण अधिक : दरात वाढ झाल्याने हळद उत्पादनाकडे शेतकऱयांचा कल

प्रतिनिधी / बेळगाव 

खरीप हंगामामध्ये इतर पिकांबरोबर हळदीचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे जिल्हय़ात हळदीचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या हंगामात जिल्हय़ात 6 हजार 500 हेक्टर क्षेत्रात हळद लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनातही वाढ होणार आहे. मध्यंतरी हळदीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. परिणामी हळदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हळद उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून बागायत क्षेत्र विस्तारत आहे. योजनेच्या माध्यमातून विविध रोप लागवड होत आहे. हळदीची रोप लागवड केली जाते. विशेषतः जिल्हय़ात एप्रिल-मे महिन्यात ही लागवड केली जाते. जिल्हय़ातील गोकाक, चिकोडी, रायबाग, अथणी, हुक्केरी तालुक्मयात हळद लागवड क्षेत्र अधिक आहे. खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने यंदा सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, भुईमूग लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. त्या पाठोपाठ हळद लागवड करणारे शेतकरीही अधिक आहेत.

बेळगाव तालुक्मयात हळदीचे उत्पादन होत नसले तरी गोकाक, चिकोडी, रायबाग तालुक्मयात हळदीचे उत्पादन होते. यासाठी शेतकऱयांनी पावसाळय़ापूर्वीच लागवड केली आहे. लागवड झालेले शेती क्षेत्र हळदीने नटले आहे. जुलै प्रारंभापासून समाधानकारक पाऊस होत असल्याने हळदीचे पीक जोमाने आले आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. काही शेतकऱयांनी यंदा प्रायोगिक तत्त्वावर हळदीची लागवड केली आहे. त्यामुळे भविष्यात हळद उत्पादन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा बागायत खात्याला आहे.

यंदा हळद लागवडीच्या प्रमाणात वाढ

यंदा जिल्हय़ात 6500 हेक्टर क्षेत्रात हळद लागवड झाली आहे. गतवषीच्या तुलनेत यंदा हळद लागवडीचे प्रमाण वाढले आहे. हळदीचे दर बाजारात वाढले आहेत. शिवाय मागणीदेखील आहे. त्यामुळे हळद उत्पादनाकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे.

Related Stories

ज्येष्ट क्रिकेटपटू प्रशांत निरंजनकडून ग्रामीण अकादमीला क्रिकेट किट

Amit Kulkarni

अस्तुली पुलानजीक ट्रक कलंडला

Omkar B

कर्नाटकात प्रथमच डी लायसन्स फुटबॉल प्रशिक्षणाला बेळगावात प्रारंभ

Amit Kulkarni

अमाननगर येथे चोरीचा प्रकार

Patil_p

भुतरामहट्टीतील सिंहांचे पर्यटकांना लवकरच होणार दर्शन

Amit Kulkarni

कन्नडती राज्य पुरस्काराने राजेश्वरी हेगडे सन्मानित

Amit Kulkarni
error: Content is protected !!