Tarun Bharat

श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद-तुषार गांधी

Tushar Gandhi : तुषार गांधी यांनी आज केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. श्रीरामाच्या नावावर देशांमध्ये आतंकवाद पसरवला जात आहे. श्रीरामाचे नाव घेऊन लोकांची हत्या केली जात आहे. हिंदूंराज्य आले पाहिजे अशी केंद्र सरकारची रणनीती आहे. याच्या सर्व हालचाली दिल्ली आणि नागपुर वरून चालतात. अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशामध्ये अस्वस्थता पसरली आहे. 1942 साली सामान्यांच्या मुक्तीसाठी जसा लढा उभारला होता तसाचं लढा पुन्हा उभारून जनक्रांती आणण्याची गरज असल्याचे गांधी यांनी नमूद केलं. देशांत एकच सरकार असल्यामुळे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. देश सध्या हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे. याला कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन ही चळवळ उभी केली पाहिजे. हर घर तिरंगा माझ्या मनात आहे. मी देशवासियांचे कौतुक करतो. पण देशाचे प्रेम करत असताना ‘ध्वजा’ ची अवस्था सध्या कशी आहे? हे सरकारने सिद्ध केले नाही. राष्ट्रप्रेम हें स्वतःच्या हृदयात असणे हें अधिक गरजेचे असल्याचे गांधी यांनी सांगितले.

Related Stories

बाळासाहेबांच्या तैलचित्र सोहळ्याबाबत ठाकरेंना वेगळी निमंत्रण पत्रिका पाठवणार-राहुल नार्वेकर

Archana Banage

पैश्याचा वादातून व्यापाऱ्याचे अपहरण

Archana Banage

केरळ-महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूचा सल्ला

Patil_p

अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का

Patil_p

महाराष्ट्रात गुरुवारी 47,371 रुग्ण बरे होऊन घरी, तर 29,911 नवीन रुग्ण

Tousif Mujawar

महाराष्ट्राचे GST चे २४ हजार ३६० कोटी रुपये मिळावे ; अजित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

Archana Banage