Tarun Bharat

बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

प्रतिनिधी /बेळगाव

बारावीच्या परीक्षेला शुक्रवार दि. 22 पासून सुरुवात होत आहे. मागील दोन वर्षांत परीक्षा झाल्या नसल्याने यावषीच्या परीक्षांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनीही बारावीच्या परीक्षेची जोरदार तयारी केली आहे.

22 एप्रिल ते 18 मे दरम्यान 12 वीच्या परीक्षा होणार आहेत. बेळगावसह चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात सुरळीत परीक्षा व्हावी यासाठी, पदवीपूर्व विभागाकडून नियोजन केले जात आहे. सकाळी 10.15 ते 1.30 या वेळेत परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीपूर्वीच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी बिझनेस स्टडीज व लॉजिकचा पेपर होणार आहे. यावषी प्रत्येक वर्ग खोल्यांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तसेच दहावीप्रमाणेच या परीक्षेतही हिजाबवर बंदी असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही ठेवला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.

Related Stories

आदर्शनगर रहिवाशांतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni

चिखले येथे दोन घरे फोडून दोन तोळे सोने – रोख रक्कम लंपास

Amit Kulkarni

दिवाळीनिमित्त धावताहेत 35 जादा बसेस

Patil_p

महात्मा गांधी नगरविकास कामाच्या निविदा रद्द करण्याची मागणी

Patil_p

हंदीगुंद ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Amit Kulkarni

पोलीस अधिकाऱयांना मिळते केवळ तीन तास विश्रांती

Patil_p