वार्ताहर /पालये
पालये-पेडणे येथील बाराजण स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या अखिल गोवा आंतरग्राम व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाला आजपासून भंडारवाडा पालये येथील बाराजण व्हॉलीबॉल कोर्टवर सुरूवात होत आहे. 14 व 15 रोजी बाद फेरीतील लढती होतील तर 2 मे रोजी उपान्त्य व अंतिम सामना खेळविण्यात येईल. स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱया संघाला रोख 25,000 व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला रोख 15,000 व चषक तर उपान्त्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघाना प्रत्येकी रोख 3000 देण्यात येतील. या व्यतिरिक्त उत्कृष्ट स्मॅशर, उत्कृष्ट सॅटर, उत्कृष्ट डिफेंडर आणि स्पर्धावीरास आकर्षक बक्षीसेही देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेणाऱया संघात एका परराज्यातील खेळाडूला खेळविण्याची परवानगी असेल. प्रवेश शुल्क रु. 1500 आहे. अधिक माहितीसाठी साहिल 9145666260 किंवा सीताराम 9146073565, शुभम यांच्याशी संपर्क साधावा. सदर स्पर्धा दिवगंत मनोहर न्हानजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे मुलगे संदीप न्हानजी (पंचायतसदस्य), सागर न्हानजी यांनी पुरस्कृत केली आहे.