डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा गर्भात सोडले
2 महिन्यांनी पुन्हा घेतला जन्म
जन्मापासून जीवनाची सुरुवात होते आणि प्रत्येकासोबत हे एकदाच घडते. परंतु अमेरिकेत एका मुलगा स्वतःच्या आईच्या गर्भाशयातून दोनवेळा जन्माला आला आहे. वैद्यकीय शास्त्राचा हा चमत्कार जाणून घेतल्यावर लोक अवाप् होत आहेत. डॉक्टरांनी पहिल्यांदा जन्मल्यावर मुलाला परत आईच्या गर्भाशयात ठेवले होते. 11 आठवडय़ांनी आता महिलेने पुन्हा या मुलाला जन्म दिला आहे.
फ्लोरिडा येथे राहणाऱया या महिलेने एकाच मुलाला दोन वेळा जन्म देण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुलाच्या कण्यामध्ये समस्या होती, याचमुळे डॉक्टरांनी जन्मापूर्वीच त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. गर्भाशयात वाढणाऱया भ्रूणाच्या पाठीच्या कण्यामध्ये समस्या असल्याचे आणि ती दूर न केल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याचे कळल्यावर जॅडेन एशले यांनी डॉक्टरांच्या एका विशेष टीमशी संपर्क साधला होता. या डॉक्टरांनी प्री-मॅच्योर बेबी बॉयला गर्भाशयातून बाहेर काढत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि मग त्याला पुन्हा गर्भाशयात ठेवले हेते.
आईच्या गर्भाशयात परतल्याच्या दोन महिन्यांनी या मुलाने पुन्हा जन्म घेतला. आता त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये कुठलीच समस्या नाही. परंतु डॉक्टरांनी सध्या आई आणि बाळाला स्वतःच्या देखरेखीत ठेवले आहे. लवकरच दोघेही स्वतःच्या घरी जाऊ शकतील. जॅडेन एशले यांनी टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करत स्वतःचा हा अनुभव शेअर केला आहे.
ओपन फोएटल सर्जरी
अनेकदा मुलाच्या जन्मानंतर तो एखाद्या जन्मजात समस्येशी झगडत असल्याचे समजते. अशा स्थितीत ते मूल आणि आईवडिल दोघांनाही त्रास होतो. अशा स्थितीत ओपन फोएटल सर्जरी एखाद्या वरदानाप्रमाणे आहे. यात मुलाच्या जन्मापूर्वीच त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. जन्मापूर्वी भ्रूण अविकसित असते. अशा स्थितीत त्याच्यातील ही समस्या दूर करणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे शक्य होते. परंतु ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड असते आणि याकरता तज्ञ डॉक्टरांच्या टीमची गरज भासते.