Tarun Bharat

विचित्र आजाराला तोंड देणाऱया जुळय़ा बहिणी

Advertisements

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद

अनेक जुळय़ा लोकांना तुम्ही पाहिले असेल, या जुळय़ा लोकांचा केवळ चेहराच नव्हे तर शरीराची उंचीही एक समान असते. परंतु दोघेही काळासोबत स्वतःच्या जेवणाच्या सवयीमुळे वजन कमी किंवा वाढवून घेतात. परंतु सर्वसाधारणपणे दोघेही एकसारखेच दिसतात. परंतु जुळय़ा बहिणींची एक जोडी अशी आहे, ज्यांचा चेहरा एकसारखा असूनही वेगळा आहे. त्यांचा रुप-रंग आणि शरीराची ठेवण अत्यंत वेगळी आहे. त्यांना एक विचित्र आजार असल्याने त्यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये 23 वर्षीय सिएना आणि सिएरा बर्नाल राहतात. दोघींचा जन्म प्रीमॉर्डियल ड्वार्फिजमसह झाला होता, याबद्दल त्यापूर्वी कधीच ऐकले गेले नव्हते. म्हणजेच या दोघी या दुर्लभ आणि विचित्र आजाराच्या पहिल्या रुग्ण होत्या. डिस्कॉर्डेंट ट्विनिंगचा सर्वात दुर्लभ आजार त्यांना झाल्याने त्यांच्या नावावर विश्वविक्रम नोंद झाला आहे.

ट्विन ग्रोथ डिस्कॉर्डेंस एक विकार असून तो गर्भाशयात वाढणाऱया जुळय़ा मुलांमध्ये होत असतो. यात एक निश्चित मर्यादेपर्यंत त्यांच्या शरीराच्या ठेवणमध्ये बदल होते. दोघींपैकी एकाचे वजन दुसऱयापेक्षा 10 टक्क्यांनी कमी असते आणि शरीरात बदल होतात. एकीकडे सिएरा 44 किलो वजनाची असून उंची 5 फूट 7 इंच इतकी आहे. तर सिएनाचे वजन केवळ 22 किलो असून उंची 4 फूट 4 इंच इतकी आहे. म्हणजेच दोघींच्या उंचीत 1 फूटाचा फरक आहे, तर वजनात 22 किलोंचा फरक आहे. छोटी बहिण विचित्र आजाराने ग्रस्त आहे. या आजाराने ग्रस्त या दोघी जगातील पहिल्या ट्विन्स ठरल्या आहेत.

आजाराला मानत नाहीत कमजोरी

दोघी बहिणी या आजाराला स्वतःची कमजोरी मानत नाहीत. परस्परांपेक्षा वेगळे आहोत असे त्यांना वाटत नाही. अनेकदा लोक आम्हाला आईमुलगी समजतात असे उंच बहिणीने म्हटले आहे. तर दोघीही बियर पिण्यासाठी गेल्यावर मला लोक 8 वर्षांची समजतात अशी तक्रार छोटय़ा बहिणीची आहे.

Related Stories

परग्रहवासियांच्या अस्तित्वाची ट्रम्प यांनाही कल्पना

Omkar B

अन्वी भूटानीची ऑक्सफोर्डच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत बाजी

Patil_p

ब्रिटनच्या रुग्णालयांवर दबाव

Patil_p

अफगाणिस्तानात ‘तहरीक-ए-तालिबान अमिरात’ची स्थापना

datta jadhav

ट्रम्प यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला न्यायालयाची परवानगी

datta jadhav

6 हजार फुटांच्या उंचीवर हॉटेल

Patil_p
error: Content is protected !!