नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात या प्रस्तावाला ट्विटरच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सदरचा करार हा 44 अब्ज डॉलर्सचा झाला आहे. ट्विटरसोबतच्या कर्मचाऱयांशी मागच्या आठवडय़ात एलॉन मस्क यांनी आभासी पद्धतीने चर्चा केली होती. कराराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याच्या बातमीनंतर कंपनीचे समभाग बाजारात 38 टक्के इतके वाढल्याचे दिसून आले.


previous post