ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Twitter cancels Blue Tick’s paid subscription decision ब्लू टिकच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी रद्द केला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ब्लू टिकसाठी युजर्सला आठ डॉलर्सचे पेड सबस्क्रिप्शन निश्चित केले होते. पण ही सर्व्हिस सुरू झाल्यापासून बनावट अकाऊंटमध्ये झपाटय़ाने वाढ होऊ लागली. मागील दोन दिवसांत एका व्यक्तीने निन्टेंडो इंक नावाच्या प्रोफाईलवर पेड सबस्क्रिप्शन घेत सुपर मारिओचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह ट्विट केलं. तर मोठी फार्मा कंपनी असलेल्या एली लिली अँड कंपनीच्या नावाने एका व्यक्तीने अकाऊंटवर ब्लू टिक घेतली आणि इन्सूलिन आता विनामूल्य असल्याचे ट्विट केले.
अधिक वाचा : आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर
आणखी एकाने टेस्ला कंपनीचं बनावट अकाऊंट तयार करून या कंपनीच्या सेफ्टी रेकॉर्डची खिल्ली उडवली. त्यामुळे मस्क यांनी पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला. ज्यांनी आधी सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांची सेवा सुरुच राहणार आहे.