Tarun Bharat

ट्विटरचं ‘एडिट’ बटण झालं ॲक्टिव्ह; पेड सबस्क्रायबर्ससाठी सुविधा मिळणार

Advertisements

Twitter Launches Edit Facility : सोशल मिडिया अकौंटवर एखादी पोस्ट शेअर केली आणि त्यात काही बदल किंवा चूका दुरुस्त करण्यासाठी एडिट हा पर्याय प्रत्येक अॅपला असतो. ट्विटरवर हा पर्याय नाही. मात्र ट्विटर इंडिया येत्या आठवड्यात त्याच्या पेड सबस्क्रायबर्ससाठी “एडिट” बटणची सुविधा देणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता पोस्ट केल्यानंतर दुरुस्ती करायची असेल तर डिलीट न करता पोस्ट अपडेट करता येणार आहे.

ट्विटर ब्लॉग पोस्टनुसार, ट्विटर ब्लूसाठी दरमहा $४.९९ भरणारे ग्राहक लवकरच ३० मिनिटांत त्यांचे ट्विट “अनेकदा” एडिट करू शकतील. टायपोसारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांचे ट्विट पब्लीश झाल्यानंतर एडिट करण्याची मागणी केली आहे.

टेकक्रंचच्या अहवालानुसार, एडिट बटण ट्वीट दुरुस्त करण्यासाठी ३० मिनिटे मिळतील. एडिट ट्विट फेरबदलाचा टाइमस्टॅम्प दर्शविणार्‍या लेबलसह दिसेल. एडिटेड ट्विटची हिस्ट्री पाहण्यासाठी, तुम्हाला ट्विट एडिट करा या बटणावर टॅप करावे लागेल.

Facebook, Reddit आणि Pinterest सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने वर्षानुवर्षे वापरकर्त्यांना पोस्ट एडिट करण्याची ऑफर दिली आहे. अहवालानुसार, संपादित केलेल्या ट्विटमध्ये एक आयकॉन आणि टाइमस्टॅम्प असेल, पोस्ट शेवटचं एडिट केल्यानंतर पब्लीश केले जाईल. युजर्सना एडिट हिस्ट्री आणि पोस्टच्या मागील व्हर्जन पाहण्यासाठी एडिट बटणावर क्लिक करावे लागेल.

Related Stories

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात; 22 जखमी

prashant_c

मध्यप्रदेशातील ‘या’ दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू

Rohan_P

नव्या संसद भवनात होणार हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफला मोठे यश

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन

Abhijeet Shinde

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा गळा घोटला

datta jadhav
error: Content is protected !!