ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्या अकाऊंटचे ब्लू टिक हटवणार आहे. 1 एप्रिलपासून ट्विटर ही कारवाई सुरू करणार आहे. परिपत्रक जारी करत ट्विटरने यासंदर्भात माहिती दिली आहे.
ज्या ट्विटर युजर्सचे ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन असेल, त्याच अकाऊंटचे ब्लू टिक कायम ठेवण्यात येतील. बाकीच्या अकाऊंटच्या ब्लू टिक हटवण्यात येणार आहेत. 1 एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 900 रुपये प्रति महिना शुल्क आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ब्लू टिक सबस्क्रिप्शनचा नवा पर्याय आणला होता. मात्र, त्यावेळी ब्लू टिक असलेल्या जुन्या व्हेरिफाईट युजर्सची ब्लू टिक हटवण्यात आली नव्हती. आता कंपनीने या जुन्या देखील ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे.