एलन मस्क यांनी नुकतेच ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय रद्द केला. एकूण ४४ अब्ज डॉलचा हा करार करण्यात येणार होता. यामुळे ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात ट्विटरने खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करारात फसवणूक झाल्याचा आरोप करत हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.