Tarun Bharat

तिलारी घाटात एकाच ठिकाणी दोन अपघात ; दोन्हीं गाड्या खोल दरीत कोसळल्या

साटेली /भेडशी प्रतिनिधी

Two accidents at the same place in Tilari Ghat; Both the cars fell into a deep ravine

तिलारी घाटातील त्या अवघड वळणावर शनिवारी एकाच दिवशी काही वेळांच्या अंतराने दोन अपघात झाले.ही दोन्हीं वाहने खोल दरीत कोसळली असून चालक ,वाहक कारमधील पर्यटक किरकोळ दुखापत सोडता सुखरूप आहेत.यात एक मालवाहतूक तर दुसरी पुण्यातील पर्यटकांच्या कार चा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून तिलारी घाटातील अपघातांचे सत्र सुरूच आहे.तिलारी रामघाटातील अपघातग्रस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या जयकर पॉइंट येथील मोठ्या उतारदार वळणावर शनिवारी एकाच दिवशी एकाच ठिकाणी काही वेळांच्या अंतराने दोन वाहनांचे मोठे अपघात झाले.यात दोन्हीं वाहने लगतच्या खोल दरीत कोसळली आहेत.यात बेळगांव हुन गोवा येथे मालवाहतूक करणारी पिकअप गाडीचा तर पुणे येथून गोवा येथे जाणाऱ्या कारचा समावेश आहे.दोन्हीही गाड्या खोल दरीत कोसळले गेल्याने या घाटातून प्रवास करणाऱ्या अन्य वाहनधारकांना या अपघातांची माहिती मिळाली नाही.रविवारी सकाळी याबाबत माहिती मिळाली आणि घटनास्थळी खाली स्थानिक नागरिक पोहोचले व अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. अपघातग्रस्त गाड्या बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्याची कार्यवाही सुरू होती.

Related Stories

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

datta jadhav

मच्छीमार तरूणाला मारहाण प्रकरणी 100 जंणावर गुन्हा

Patil_p

बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Archana Banage

2022 पर्यंत 36 राफेल विमाने ताफ्यात

Patil_p

आरटीओ कार्यालयात ऑनलाइन ट्रेंनिग

Rohit Salunke

कराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा डाव

datta jadhav
error: Content is protected !!