Tarun Bharat

इचलकरंजीत तयार होतोय अडीच किलोमीटरचा तिरंगा

15 ऑगस्ट रोजी व्यापणार शाहू पुतळा ते डीकेटीई इन्स्टिटय़ूट अंतर

इचलकरंजी / संजय खूळ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी हर घर तिरंगा ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली जात असताना इचलकरंजीत तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. 14 फूट रुंद आणि 2500 मीटर लांबीचा हा ध्वज येत्या सहा दिवसांत तयार होणार असून त्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा ध्वज तयार करण्यात येत आहे.

महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून लौकिक असलेल्या इचलकरंजी शहराला ध्वज तयार करण्याची मोठी परंपरा आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशातल्या अनेक राज्याच्या निवडणुकीत या ठिकाणी ध्वज तयार होऊन जातात. हर घर तिरंगाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणात ध्वज तयार होऊ लागले आहेत. मात्र सर्वाधिक मोठा ध्वज तयार करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.

आमदार प्रकाश आवाडे यांनी हर घर तिरंगा मोहिमेसाठी तब्बल 40 हजार ध्वज महानगरपालिकेला सुपूर्द केले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी सकाळी 10 वाजता भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी तब्बल अडीच किलोमीटरचा ध्वज तयार करण्यात येत आहे. या ध्वजाची रुंदी 14 फूट तर लांबी अडीच हजार मीटर इतकी असणार आहे. यासाठी तब्बल साडेसात हजार मीटर कापड वापरण्यात येणार आहे. एकूण 75 कापडाचे तागे यासाठी वापरले जातील. प्रत्येकी 25 तागे हे दोन रंगासाठी वापरले जातील तर उर्वरित 25 तागे धाग्याचा कलर हा पांढरा असेल.

हा ध्वज तयार करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. यासाठी दोन रंगाच्या कापडाचे प्रक्रिया येथेच स्थानिक व्यावसायिकास देण्यात आले आहे. प्रत्येकी 100 मीटरचे कापड नंतर गारमेंट फॅक्टरीत शिलाई करण्यासाठी दिले जाणार आहे. इचलकरंजीच्या कापड उद्योग व्यवसायाच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा ध्वज यानिमित्ताने तयार होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी हा ध्वज शाहू पुतळ्या पासून ते राजवाडा चौकातील डीकेटीई इन्स्टिटय़ूटपर्यंत सुमारे अडीच किलोमीटरचा अंतर व्यापणार आहे.

असा असेल ध्वज
आकार 2500 मीटर लांब व 14 फूट रुंद
कापड 7500 मीटर कॉटन पॉलिस्टर
क्वॉलिटी 150 रोटोबाईक बाय 20 सी.पी
कापडाचा रंग पोस्ट कलर
वैशिष्टय़ ऊन, वारा, पावसात रंग कायम
ध्वज होणार सहा दिवसांत तयार

Related Stories

जनुकीय परावर्तीत, एचटीबीटी बियाणेची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 42 पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे उद्घाटन, जंबो सिडलेस द्राक्षे खास आकर्षण

Archana Banage

सव्वातीन तासांत 22 किलोमीटरची रंकाळा परिक्रमा

Archana Banage

जिह्यात 32 हजार 789 नावे दुबार

Kalyani Amanagi

कोल्हापुरात शिवभोजन थाळी योजनेला प्रारंभ

Archana Banage