वार्ताहर /केपे
राज्यात पंचायत निवडणूक जाहीर झाली असून केपे तालुक्मयातील 11 पंचायतापैकी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी फार्तपा पंचायतीतून दोन अर्ज दाखल झाले आहेत. यात प्रभाग दोन मधून माजी पंच मेंदीनी नाईक, तर प्रभाग सात मधून माजी पंच दीपक देसाई यानी अर्ज केले आहे.
केपे तालुक्मयात अकरा पंचायती असून चार मतदारसंघांत त्यांचा समावेश होत आहे. यात सात केपे, कुडचडे, सांगे व कुकळ्ळी हे मतदार संघ आहेत. त्यामुळे कुडचडे व सांगे या मतदारसंघात भाजपचे आमदार व मंत्री आहेत. तर कुकळ्ळी या मतदारसंघात आंबावली व काही प्रमाणान बाळ्ळी पंचायत भाग समावेश असल्याने या मतदारसंघात काँग्रेस आमदारांचा प्रभाव आहे.
उर्वरित पंचायतीचा समावेश केपे मतदारसंघात असून काँग्रेसचे आमदार एल्टन डिकास्टा यांना भाजप कडून या पचायती काबीज कराव्या लागणार आहेत.