Tarun Bharat

महाविद्यालयाच्या संचालकाला खंडणी मागणारे दोघे अटकेत

पुणे : सासवड परिसरातील एका महाविद्यालयाच्या संचालकाला धमकावून तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

अक्षय सुभाष मारणे (वय 29), गणेश बबनराव जगताप (वय 40, दोघे रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे अहोत. याबाबत महाविद्यालयाच्या संचालकांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदारांचे सासवड परिसरात महाविद्यालय आहेत. आरोपी मारणे आणि जगताप यांनी महाविद्यालयाच्या संचालकांना तुमच्या विरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे, यासंदर्भातील माहिती बाहेर पसरविण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. सासवड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने धमकावत ही खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या संचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून दोघांना पकडले. दरम्यान, आरोपींनी सासवड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाचा वापर करुन महाविद्यालयाच्या संचालकांना धमकावल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करत आहेत.

अधिक वाचा : पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी

Related Stories

गोकुळवरुन मुन्ना-बंटी पुन्हा आमने सामने,दुध का दुध और…

Archana Banage

एका रात्रीत पंचगंगा नदीची पातळी ८ फुटांनी वाढली, बर्कीचे पर्यटक सुखरूप माघारी, पावसाचा जोर कायम

Rahul Gadkar

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही शिंदे-फडणवीस गप्प का?

Archana Banage

… तर 2 एप्रिलला लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार

Tousif Mujawar

राहुल गांधींना शेगावात काळे झेंडे दाखवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

Archana Banage

अक्कलकोट येथे खेळण्यासाठी बांधलेल्या साडीला गळफास लागून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Archana Banage