Tarun Bharat

‘अग्निपथ’ भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना अटक

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Two arrested for giving fake certificates for ‘Agnipath’ recruitment लष्कराच्या अग्निपथ भरती योजनेत सहभागी होण्यासाठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र काढून देणाऱ्या दोघांना पुण्यात गुन्हे शाखेने अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोपट विठ्ठल आलंदार (वय 38) आणि सुरेश पितांबर खरात (31, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, डोमिसाइल प्रमाणपत्र, रोकड तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणात त्यांचे अन्य कोणी साथीदार सहभागी आहेत का? या संदर्भातही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : संघर्षालाही मर्यादा असावी; पवारांनी दसरा मेळाव्यावरुन टोचले दोन्ही गटाचे कान

लष्करातील नोकरीसाठी भरतीसाठी सध्या मुंबईत अग्निपथ भरती सुरू आहे. त्यात जी डी (जनरल ड्युटी) आणि टेक्निकल अशा दोन पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील रहिवासी अर्ज करू शकतात. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही उमेदवारांनी एका संस्थेत संपर्क साधला. आरोपींकडून बनावट रहिवाशी दाखला दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, आलंदार आणि खरात यांनी बनावट शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुरावा तयार करण्यासाठी बनावट भाडे करार तयार केला होता. तसेच सरपंचाचा दाखला घेऊन बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करुन घेतले होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर कात्रज-देहूरोड रस्त्यावर आलंदार आणि खरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. यावेळी सापळा लावून दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले आढळले आहे. त्यांनी तब्बल 40 उमेदवारांना बनावट रहिवासी प्रमाणपत्रे तयार करून दिल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. याबाबत अधिक तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.

Related Stories

भास्कर जाधवांना चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांची नोटीस

Archana Banage

मला ‘चंपा’ म्हणणं थांबलं नाही तर तुमच्या मुलापासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

Archana Banage

आशा बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश

Tousif Mujawar

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टला हरिद्वार कुंभमेळयाचे विशेष निमंत्रण

Tousif Mujawar

सांगली : सावकारी, खुनीहल्ला प्रकरणी दोघांवर गुन्हा

Archana Banage

छत्रपती शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?; खासदार उदयनराजेंचा संताप

Archana Banage