एक लाख 80 हजाराचा ऐवज हस्तगत : वाई, सातारा तालुक्यातील सहा ठिकाणी केल्या होत्या चोऱ्या :करंजे नाका येथून घेतले ताब्यात
सातारा/प्रतिनिधी
सातारा आणि वाई तालुक्यातील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधून तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलय.त्यांनी त्यातील सहा गुन्ह्याची कबुली दिलीय. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना करंजे नाका येथे ताब्यात घेतले. विजय काळे, आकाश प्रकाश भोसले अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची नवे आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की तांबे चोरीतील गुन्हेगार करंजे नाका परिसरात येणार आहेत. त्यावरून त्यांनी एक पथक तयार केले आणि सापळा रचून अतिक्रमण काळे, आकाश भोसले या दोघांना ताब्यात घेतले. अतिक्रमण हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याने गेल्या चार वर्षात वाई, सातारा तालुक्यात सहा ठिकणी तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली असून त्या दोघांकडून २२६ किलोच्या १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या सुचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.