म्हापसा पोलीसांची कारवाई : ४ दुचाकी जप्त
प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यातील दुचाक्या चोरीप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गस्त घालून आरोन स्टिवन केंडीड मोंतेरो (रा. बामणवाडा शिवोली) व अन्य 17 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीनंतर त्याच्याकडून 4 दुचाक्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
दि. 8 जानेवारी रोजी तळेवाडा रेवोडा येथील दत्ताराम हनुमन मांद्रेकर यांनी आपली यमाहा फसिनो स्कूटर जीए-03-एई-4811 डांगी कॉलनी म्हापसा येथून चोरीस गेल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार एलआयबी टिमने अथक प्रयत्न करून वरील चोरटा पोलिसांच्या हाती लागला.
चौकशीअंती स्टिवन मोंतेरोने चोरीची कबुली देत यमाहा फसिनो जीए-03-एई-4811, हिरो पॅशन मोटारसायकल एमएच-07-यू-8291, स्प्लेंडर हीरो होंडा – जीए-03-डी-7045 व एक्टिव्हा जीए-03-एएन-4935 ही चोरल्याच्या गाडय़ा दाखविल्या. पोलिसांनी पंचनामा करून त्या रितसर जप्त केल्या. या गाडय़ांची किंमत 3 लाख रुपये आहे. संशयित आरोपीस रिमांडसाठी नेले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. उपनिरीक्षक विराज कोरगावकर, हवालदार केशव नाईक, सुशांत चोपडेकर, एलआयबी टिम प्रकाश पोवळेकर, अभिषेक कासार, आनंद राठोड, अक्षय पाटील यांनी ही कारवाईक करीत चोरटय़ास अटक केली.