Tarun Bharat

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले; महापूराची धास्ती कायम

Advertisements

राधानगरी प्रतिनिधी

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बंद झालेले राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळी चार वाजता पुन्हा एकदा उघडले आहेत. ४ आणि ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. आता ७ नंबरचा दरवाजाही उघडला आहे. त्यामुळे सध्या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून ८ हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर विद्युत गृहातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून एकूण ८७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.

गेल्या २४ तासात पासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर राधानगरी धरणाचे बंद झालेले स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडल्याने कोल्हापूरकरांच्या वर आजही महापूराची धास्ती कायम आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 81 नवे रूग्ण, 80 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू ?

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हद्दवाढी विरोधात गावसभेत ठराव करा

Abhijeet Shinde

पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे

Abhijeet Shinde

विद्युत तारेच्या धक्याने बापलेकांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!