Tarun Bharat

बेळगुंदीत एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

केवळ वीस मिनिटांच्या अंतरावर दोघांनी घेतला अखेरचा श्वास : परिसरात हळहळ

वार्ताहर /किणये

बेळगुंदी गावात दोन सख्ख्या भावंडांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. त्या दोघांना किरकोळ आजार झाल्यामुळे सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे पहिल्यांदा लहान भावाचे हृदयविकाराने निधन झाले त्यानंतर केवळ अवघ्या वीस मिनिटांतच अन्य मोठय़ा भावाचेही निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 आप्पाजी रवळू गावडा (वय 72) यांचे मंगळवारी पहाटे 3.40 वाजता निधन झाले. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर त्यांचे मोठे बंधू तुकाराम रवळू गावडा (वय 74) यांचेही निधन झाले. एकाच दिवशी दोघा भावांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे बेळगुंदी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.

तुकाराम यांना जुलाबाचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर सोमवारी सकाळी सोनोली गावातील खासगी डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे लहान बंधू आप्पाजी यांनाही चक्कर आल्यामुळे त्यांनाही सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पहाटेच्या दरम्यान आप्पाजी यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर तुकाराम यांचीही प्राणज्योत मालवली.

अलीकडे भावा-भावांमध्ये पटत नाही. वारंवार भांडणांचे प्रकार वाढू लागले आहेत. अशी परिस्थिती असतानाच बेळगुंदी गावातील या दोन्ही भावांनी एकाच दिवशी निरोप घेतल्यामुळे त्यांचे हे अनोखे बंधुप्रेम दिसून आले. या दोघांना अन्य  तीन बंधू आहेत.

तुकाराम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तर आप्पाजी यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

 दोघांवर बेळगुंदी येथे मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.

Related Stories

भातकांडे स्कूलतर्फे श्वेता जाधवचा गौरव

Amit Kulkarni

युनियन जिमखाना – दाभोली गोवा यांच्यात अंतिम लढत

Amit Kulkarni

कर्नाटक: कोरोना आणि पावसाच्या दरम्यान नागरिकांनी सावधगिरी बाळगा: मंत्री सुधाकर

Archana Banage

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान

Amit Kulkarni

न्यू गांधीनगर येथील रेल्वेगेट दुरुस्तीमुळे राहणार बंद

Amit Kulkarni

गोकाक रुग्णालयात ऑक्सिजन युनिटचे उद्घाटन

Omkar B