सुदैवाने जीवितहानी टळली : दोन्ही वाहनांचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
काँग्रेस रोडवर शनिवारी रात्री उशिरा दोन कारची धडक झाली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर व स्विफ्ट या दोन कारची धडक बसून अपघात झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांना पाचारण करण्यात आले. भर पावसात घडलेल्या या घटनेनंतर बघ्यांची गर्दी जमली. दोन्ही वाहने वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात नेण्यात आली. रविवारी सायंकाळपर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता.