प्रतिनिधी /बेळगाव
फेसबुक प्रेंड्स सर्कल व पृथ्वीसिंग फौंडेशनच्या पुढाकाराने मार्केट यार्ड कंग्राळी येथील व्यापारी नारायण टुमरी यांनी बिम्स् हॉस्पिटलला दोन सिलिंग फॅन भेट दिले. मनोरुग्ण विभागासाठी हे फॅन देण्यात आले असून बिम्स्चे कार्यकारी संचालक डॉ. आर. जे. विवेकी यांच्याकडे हे फॅन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी बिम्स्चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. बी. पाटील, मानसोपचारतज्ञ डॉ. चंद्रशेखर, पृथ्वीसिंग व जसवीरसिंग, फेसबुक प्रेंड्सचे संतोष दरेकर व अवधूत तुडयेकर उपस्थित होते.