Tarun Bharat

महापालिका बजेटअंतर्गत पावणे दोन कोटी राखीव निधी

लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेच्या विविध अनुदानामधून मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी राखीव निधी ठेवला जातो. 2021-22 या आर्थिक वर्षात 24.10 टक्के योजनेंतर्गत 1 कोटी 33 लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. 7.25 टक्के योजनेंतर्गत 40 लाख निधी राखीव असून, योजनेंतर्गत लाभासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत.

महापालिकेच्यावतीने मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबविल्या जातात. स्वयंरोजगार, गॅस जोडणी, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप सुविधा तसेच स्वच्छता कर्मचाऱयांसाठी विमा योजना अशा विविध सुविधा अपलब्ध करण्यात येतात. याकरिता शासनाने घालून दिलेल्या मार्गसूचीनुसार अर्ज मागवून लाभार्थींची निवड केली जाते. राखीव असलेल्या निधीमधून लाभार्थींची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 एसएफसी अनुदानांतर्गत 24.10 टक्के योजना राबविण्यासाठी 1 कोटी 33 लाख निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यापैकी 53 लाख 20 हजारचा निधी वैयक्तिक योजना राबविण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित 79 लाख 80 हजार निधीमधून निधी मागासवर्गीय वसाहतींमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी राखीव आहे.

दिव्यांगांसाठी 28 लाख राखीव

मनपाच्या 7.25 टक्के योजनेअंतर्गत अल्पसंख्याकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. याकरिता मनपा अनुदानांतर्गत 40 लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच दिव्यांगांसाठी 5 टक्के योजनेसाठी महापालिकेच्या अनुदानांतर्गत 28 लाख रुपये राखीव आहे. प्रशासनाकडून कृती आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. 

Related Stories

स्वच्छतेसाठी वॉर्डस्तरीय अधिकारी-कंत्राटदारांची यादी जाहीर

Amit Kulkarni

आता रिंगरोडविरोधात जनआक्रोश आंदोलन

Amit Kulkarni

तालुक्यात दिवाळीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात

Patil_p

हॉटेलचा कचरा टाकणाऱयांवर होणार कारवाई

Patil_p

रेल्वेस्थानकाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार

Amit Kulkarni

गुंजीत श्री माऊली देवी पालखी सोहळा उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!