Tarun Bharat

दोन दिवसांच्या तेजीला विराम!

सेन्सेक्स 709 अंकांनी प्रभावीत : टीसीएस, मारुती सुझुकी तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्समध्ये मोठी घसरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत राहिले होते. मागील दोन दिवसांच्या सत्रातील कामगिरीत मात्र सेन्सेक्स व निफ्टीने मजबूत स्थिती प्राप्त केल्याचे दिसून आले होते. बुधवारी मात्र यात घसरण झाल्याचे दिसून आले.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 709.54 अंकांनी घसरुन निर्देशांक 51,822.53 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 225.50 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,413.30 वर बंद झाला आहे. यामध्ये काही वेळ सेन्सेक्स 792.09 अंकांनी प्रभावीत झाल्याचे दिसून आले होते.

दिग्गज कंपन्यांपैकी टाटा स्टील, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड कॉर्प व मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले आहेत. या वेळी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामधून जवळपास 2,701.21 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केल्याचे दिसून आले.

जागतिक बाजारांमधील वातावरण

आशियातील अन्य बाजारांमध्ये मुख्य बाजारांपैकी जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँगसेंग यांचे निर्देशांक हे घसरणीत राहिले आहेत. तसेच  चीनचा शांघाय कम्पोझिट हा बाजारही घसरणीसह बंद झाला आहे.

बाजारामध्ये चांगली तेजी येण्याची शक्यता असून मंगळवारी हा सकारात्मक बदल दिसून आला. यावरुन तेजी का गमावली यावर प्रश्न निर्माण केले जात आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाईची बातमी वगळता अन्य कोणतीही सकारात्मक बातमी मिळालेली नाही. या वातावरणाचा नकारात्मक परिणाम बाजाराला फटका देणारा ठरला आहे.

Related Stories

शेअर बाजाराची आठवडय़ाची सुरूवात तेजीसह

Omkar B

पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची घसरण

Patil_p

टेक्स्टाईल उद्योगाची स्थिती सुधारण्याचे संकेत

Patil_p

कृषी, प्रक्रिया खाद्याच्या निर्यातीत वाढ

Patil_p

‘गोएअर’चा आयपीओ लवकरच

Patil_p

अकासाचे उड्डाण होणार उशिरा

Patil_p
error: Content is protected !!