Tarun Bharat

शिरशी-कारवार पर्यटनासाठी दोनदिवशीय पॅकेज सुरु …

Advertisements

वायव्य कर्नाटक पथ परिवहन उत्तर कन्नड विभागाच्यावतीने दोन दिवसांच्या टूर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे .

किनारपट्टीतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी या पॅकेजचा लाभ घेऊ शकता. शिरसी आणि कारवार येथून ही सेवा उपलब्ध आहे. दोन दिवसांच्या टूर पॅकेजला ‘किनारपट्टीतील मंदिरे आणि धर्मस्थळ दर्शन’ असे नाव देण्यात आले आहे. हा दौरा दर शनिवारी सुरू होईल.

शिरसी आणि कारवार येथील कोल्लूर-उडुपी-धर्मस्थळ-सुब्रह्मण्य या पर्यटनस्थळांसाठी ही विशेष पॅकेज टूर जाहीर करण्यात आली आहे. तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील बुक करता येतात.

शिरसी-कोल्लूर-उडुपी-धर्मस्थळ- कुक्के सुब्रमण्य हे दोन दिवसांचे पॅकेज शनिवारी सुरू होईल. प्रौढांसाठी रुपये 800 आकारण्यात येईल. आणि मुलांसाठी (12 वर्षाखालील) 600 रु.आकारण्यात येईल. जेवण, नाश्ता, मंदिर प्रवेश शुल्क आणि पूजा खर्च वगळून ही किंमत निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

‘बेळगाव श्री’ शरीरसौष्टव स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

राखीव दलाचे कमांडंट हमाजा हुसेन यांचा सत्कार

Amit Kulkarni

सुगीच्या तेंडावरच जनावरांचा बाजार बंद

Amit Kulkarni

मुतगा शिवारातील नाल्याच्या दुरुस्तीचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

Omkar B

टिळकवाडी विभाग, सेंट पॉल्स यांना विजेतेपद

Amit Kulkarni

महिलेला लुटणाऱया टोळीतील आणखी एकाला अटक

Patil_p
error: Content is protected !!