4.7 आणि 5.3 रिश्टर स्केल तीव्रता
काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळमध्ये मंगळवारी रात्री उशिरा दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. बागलुंग जिह्यात पहाटे 01ः23 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर 02ः07 वाजता बागलुंग जिह्यातील खुंगा परिसरात 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या धक्क्यांमध्ये जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. नेपाळबरोबरच उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.