Tarun Bharat

विजेच्या धक्क्याने दोघा शेतकऱयांचा मृत्यू

सौंदत्ती तालुक्मयातील हिरुर येथील दुर्घटना

प्रतिनिधी/ बेळगाव

सौंदत्ती तालुक्मयातील हिरुर येथे उसाच्या मळय़ात काम करताना विजेचा धक्का बसून दोन शेतकरी जागीच ठार झाले. शनिवारी ही घटना घडली आहे.

फकिराप्पा सिद्धाप्पा चंदरगी (वय 54), महादेव दुर्गाप्पा मेत्री (वय 40) दोघेही राहणार हिरुर अशी त्या दुर्दैवी शेतकऱयांची नावे आहेत. तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन दोघा शेतकऱयांचा बळी गेला आहे. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उसाच्या मळय़ात दोन्ही मृतदेह शेजारीच पडले होते. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सायंकाळी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले.

हेस्कॉमचा दुर्लक्षपणा कारणीभूत

मुख्यवीजवाहिनी तुटून पडल्याने ही घटना घडली आहे. दोन शेतकऱयांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. खांब पडायला आले आहेत. हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे त्यांची दुरुस्ती वेळेत होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असा आरोप शेतकऱयांनी केला.

Related Stories

अवघे गर्जे कपिलेश्वर….!

Amit Kulkarni

हिंडलग्यात उद्यापासून कडकडीत लॉकडाऊन

Amit Kulkarni

न्यायालयाच्या निकालामुळे सौहार्द सहकारी करमुक्त

Patil_p

आरपीडी महाविद्यालयाच्या तिघींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

त्वरित रोगनिदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा

Amit Kulkarni

मजगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर

Amit Kulkarni