Tarun Bharat

बाबुश मोन्सेरातप्रकरणी आज दोन सुनावण्या

प्रतिनिधी /पणजी

बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात असलेल्या दोन विविध प्रकरणांची सुनावणी एकाच दिवशी आज शुक्रवारी न्यायालयात होणार आहे. 15 वर्षांपूर्वी झालेल्या पणजी पोलिसस्थानक हल्ला प्रकरण व बलात्कारप्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या दोन्ही प्रकरणावर एकाच दिवशी सुनावणी होणार असल्याने या निवाडय़ाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

पोलिस ठाणे हल्लाप्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून, त्यांनी न्यायालयात मूळ तक्रार सादर न केल्याने न्यायालयाने सीबीआयला फटकारले होते. 2 डिसेंबरपर्यंत तक्रारीची मूळ प्रत न्यायालयात सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने पोलिस ठाणे हल्ला प्रकरणाच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बाबूशविरोधात बलात्कार प्रकरणही नोंद असल्याने याही प्रकरणाची न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

Related Stories

गोवा मुक्तीनंतर साटेली, काझरेद्याट,बंदीरवाडा गावांना मिळणार रस्त्याची सुविधा

Amit Kulkarni

…तर आयआयटी प्रकल्प फर्मागुडीत आणा !

Omkar B

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक विधेयकांना मंजुरी

Omkar B

‘सेझ’ जमीन लिलाव प्रकरणी राज्य सरकारला नोटीस

Amit Kulkarni

राज्यात आज दत्तजयंती उत्सव

Patil_p

लोकोत्सवातून देशवासीयांना गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन होणार : सभापती रमेश तडवडकर

Amit Kulkarni