Tarun Bharat

कळसई येथे झाड कोसळून दोन घरांची हानी

प्रतिनिधी /धारबांदोडा

कळसई-दाभाळ येथे दोन घरांवर फणसाची मोठी फांदी कोसळल्याने दोन्ही घरांचे मिळून साधारण रु. 40 हजारांचे नुकसान झाले. त्यापैकी शांताबाई गावकर या अत्यंत गरीब व एकटय़ाच राहणाऱया महिलेला या घटनेमुळे मोठा फटका बसला आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

शांताबाई शांताराम गावकर हिच्या घराला लागूनच असलेल्या सुशांती गावकर यांच्याही घरावर फांदीचा काही भाग कोसळल्याने साधारण रु. 20 हजारांची हानी झाली. शांताबाई यांच्या घराच्या एका खोलीची बरीच नुकसानी झाली असून भर पावसात तिला आवराआवर करणे कठिण बनले आहे. कुडचडे अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी येऊन घरावरील फांदी हटविली.

Related Stories

लाड कुटुंबाचे धाडस प्रेरणादायी

Amit Kulkarni

गोवा डेअरीचा आज सुवर्ण महोत्सवी शुभारंभ

Patil_p

दहावी-बारावी परीक्षा लॉकडाऊन संपल्यानंतर

Omkar B

जांबावली दामोदर संस्थानकडून मुख्यमंत्री निधीस 3.33 लाख

Omkar B

पेडणे पाटो रस्त्यावर भलामोठा मधोमध खड्डा

Amit Kulkarni

खोल अपघातात दुचाकीचालक जखमी

Amit Kulkarni