Tarun Bharat

विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी

टेम्पोची रस्सी गळय़ात अडकल्याने अपघात

प्रतिनिधी/ नागठाणे

ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर निसराळे फाटा (ता. सातारा) येथे झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. विशाल बबन गुरव (वय 27, रा.आडदेव, ता.पाटण) व सागर आदिक कुंभार (रा. सागवड, ता. पाटण) अशी जखमींची नावे आहेत.

  याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गुरव व सागर कुंभार हे शिरवळ येथे कामास आहेत. दसऱयाच्या सुट्टीनिमित्त मंगळवारी दुपारी कामावरून सुटल्यावर दुचाकीवरून हे दोघे घरी पाटणकडे निघाले होते.         सायंकाळी 5.30 च्या सुमारास त्यांची दुचाकी महामार्गावरील निसराळे फाटा येथे आली. यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोच्या चालकाने टेम्पोवर रस्सी बांधण्यासाठी अलीकडील बाजूकडून महामार्गाकडे टेम्पोवरून रस्सी फेकली. नेमकी ही फेकलेली रस्सी महामार्गावरून निघालेल्या या दुचाकीवरील चालक विशाल गुरव यांच्या गळ्यात अडकली. त्यामुळे जोरदार झटका बसून हे दोघेही महामार्गावर आपटले.

  या अपघातात विशाल गुरव यांच्या गळ्याला जखम होऊन डावा पाय प्रॅक्चर झाला तर सागर कुंभार यांच्या चेहऱयावर रस्सीचा जोरदार फटका बसल्याने चेहयाला दुखापत होऊन पडल्यानेही जखमी झाला. या दोघांवर सातारा येथील खासगी  रुग्णालयात उपचार सुरू आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास हवालदार विजय देसाई व प्रकाश वाघ करत आहेत.

Related Stories

एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाचे संभाषण व्हायरल

Archana Banage

शाहूपुरीचा पाणी पुरवठा आजपासून सुरळीत होणार

Patil_p

सातारा : वनगळ येथील शेतीचे नुकसान थांबवा

Archana Banage

सोमय्यांना झालेली जखम कृत्रिम? गृहखातं करणार पडताळणी

datta jadhav

लोकमान्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य कोणीही हिराऊ शकत नाही : पी. चिदंबरम

datta jadhav

सातारा : खंबाटकी घाटात आढळला अर्धवट जळालेला युवतीचा मृतदेह

Archana Banage