Tarun Bharat

दहशतवादी कट उधळला; ISI च्या दोन दहशतवाद्यांना दिल्लीत अटक

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

दिल्ली पोलिसांनी ISI साठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक करत हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी हे दहशतवादी बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते.

दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी येथील भालस्व डेअरीवर छापेमारी करत या दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहे. तसेच चौकशीदरम्यान त्या दोघांनी दिलेल्या माहितीवरून भालसवा नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या दोन्ही दहशतवाद्यांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

या दहशतवाद्यांचे हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांच्याशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे दोन्ही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या आश्रयाखाली तयार करण्यात आले आहेत. ज्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे.  

Related Stories

केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या महत्वाची बैठक

Patil_p

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar

‘जी-20’च्या तयारीवर सर्वपक्षीय चर्चा

Patil_p

“फक्त हिंदू सणांमध्येच सांस्कृतिक दहशतवाद…”

Archana Banage

प्रवासी रोडावले…बसची चाके थांबली

Patil_p

भेडशी कॉजवेला भगदाड ;अपघात होण्याची वाट शासन बघतंय का ?

Anuja Kudatarkar