Tarun Bharat

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक : दहाजण जखमी

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन चालकासह दहा प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी बेळगाव – बागलकोट मार्गावर हलकी क्रॉसनजीक अपघात झाला.
बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील हलकी क्रॉस नजीक आज शुक्रवारी सकाळी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात मोठी हानी झाली नाही.

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

Related Stories

सीडी उखडून टाकल्याने वाहतुकीस अडथळा

Amit Kulkarni

विनासीटबेल्ट आढळल्यास एक हजार रुपये दंड

Omkar B

अनमोल रत्न गमावले

Omkar B

किरण करंबळकर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

Amit Kulkarni

निपाणीत कोव्हीड केअर सेंटरची तयारी

Patil_p

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना गंडा

Omkar B
error: Content is protected !!