दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स युनिट स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पंजाबमधून दोन खलिस्तानी हस्तकांना अटक केली आहे. खलिस्तानी दहशतवादाच्या नेटवर्कवर धडक कारवाई करत राजन भाटी आणि चिना यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही ड्रग्ज पुरवण्याचे काम करतात. अमली पदार्थांचा पुरवठा करण्याबरोबरच ते पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिकेचे नेटवर्क चालवण्यातही सक्रियपणे वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांचीही अधिक चौकशी सुरू असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.