किणे /वार्ताहर
किणे-नेसरी मार्गावरील शांताई पोल्ट्रीनजीक शूक्रवार दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये किणे येथील प्रकाश पांडुरंग केसरकर (वय-40)व आर्जुनवाडी ता.गडहिंग्लज येथील विलास हुलजी पाटील वय 48 हे दोघेजण जागीच ठार झाले. प्रकाश केसरकर व विलास पाटील हे दोघे नेसरी येथून किण्याच्या दिशेने स्पेलंडर मोटरसायकल वरून येत होते.
दरम्यान, किणे-नेसरी मार्गावरील चढतीला मोबाईल टॉवरनजीक आजऱ्याकडून येणाऱ्या मारुती कारने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.यामध्ये प्रकाश केसरकर हे जागीच ठार झाले तर विलास पाटील यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचे निधन झाले.या अपघाताची फीर्याद गणपती केसरकर यांनी नेसरी पोलीस ठाण्यात दिली असून चारचाकी वाहन चालक सचीन सुरेश साखरे रा.नेसरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकाश केसरकर हे दौलत साखर कारखान्यात तर विलास पाटील हे वन विभागात कार्यरत होते.प्रकाश केसरकरच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.तर विलास पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे.
अधिक वाचण्यासाठी- हसन मुश्रीफ चेकमेट…के.पी, आबिटकरांना थेट आव्हान

