बेळगाव : खानापूर तालुक्यातील गोधोळी येथे आज अज्ञात कारच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाबळेश्वर शिंदे (वय 65) व पुंडलीक रेडेकर (वय 72) अशी मृतांची नावे असून उसाला पाणी देऊन शेतातtन घरी परतत असताना हि दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी शासकीय रुiणालयाला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व जखमींची विचारपूस केली.