Tarun Bharat

वडगाव हवेलीजवळ दोन अपघातात दोघे ठार

Advertisements

वार्ताहर/ दुशेरे

कराड तालुक्यातील वडगाव हवेलीजवळ कराड ते तासगाव या राष्ट्रीय मार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. दिलीप भीमराव जगताप (वय 58, रा. वडगाव हवेली) व आकाश लोंढे (वय 35, रा. कार्वे नाका, गोळेश्वर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुनील गोतपागर जखमी आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रात्री नऊच्या सुमारास पहिला अपघात घडला. दिलीप जगताप हे त्यांचे सहकारी सुनील गोतपागर यांच्याबरोबर आपल्या दुचाकीवरून शेणोली स्टेशनकडून वडगाव हवेलीस घरी येत असताना वडगावच्या फाटय़ाजवळ कराडच्या दिशेने वेगाने आलेल्या चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघात घडताच चारचाकी कारच्या एअर बलून उघडले व जगताप यांचा एक पाय पूर्णतः तुटला. त्यांना व जखमी गोतपागर यांना कराड येथे उपचारासाठी नेत असताना जगताप यांचा वाटेतच मृत्यू झाला. जगताप यांच्या मागे पत्नी व मुले असा परिवार आहे.

या अपघातामधील चारचाकी वाहन रस्ता ओलांडून बाहेर गेलेल्या ठिकाणावरून बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली. सुमारे तासभर अंतराच्या आत कराडकडून शेणोलीकडे चाललेल्या दुचाकीस्वारास अंधारात क्रेन न दिसल्याने तो त्या क्रेनवर जोरात आदळल्याने आकाश लोंढे जागीच ठार झाला.

Related Stories

भिडे गुरुजींची अनगोळ येथील गणेशोत्सव मंडळांना भेट

Amit Kulkarni

शिक्षणात राजकारण आणू नका; कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Sumit Tambekar

मनपाच्या विनामास्क कारवाईत शिथिलता

Patil_p

माळी गल्ली मंडळातर्फे नागरिकांना धान्याचे वाटप

Patil_p

प्रदर्शनीय सामन्यात जीतीन इलेव्हन विजेता

Amit Kulkarni

एमबीबीएस-पीजीच्या विद्यार्थ्यांना कोविड-19 च्या सेवेसाठी हजर राहण्याची सूचना

Patil_p
error: Content is protected !!