वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सेडर रॅपिड्स येथील नाईट क्लबमध्ये रविवारी मध्यरात्री उशिरा गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. टॅबू नाईटक्लबमध्ये भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता गोळीबाराची घटना घडली. यासंबंधीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीने तेथे पोहोचले. मात्र, हल्लेखोर हाती लागू शकले नाहीत. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच पोलिसांनी पीडितांची नावे किंवा जखमींची स्थिती जाहीर केलेली नाही.