Tarun Bharat

बिबट्याचे दोन बछडे विहिरीत मृतावस्थेत

Two leopard cubs dead in a well

भक्ष्याची पाठलाग करताना कुडाळ तालुक्यातील वालावल – शिरसोडवाडी येथील सुशांत चंद्रकांत मणेरकर यांच्या शेत विहीरीत बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत शनिवारी आढळले.सुमारे दीड वर्षे वयाचे सदर मादी बछडे असून त्या दोंघावर अत्याविधी करण्यात आले.
श्री मणेरकर यांच्या शेतविहिरीत काल बिबट्याचे दोन बछडे मृत अवस्थेत दिसले. याबाबतची माहिती वालावल पोलीस पाटील उमेश शृंगारे यांनी नेरूर त हवेली वनपाल धुळु कोळेकर यांना दिली.तेव्हा वनपरिक्षेत्र कुडाळची रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाली सुमारे 30 फूट खोल विहिरीतून सदर मृत बछड्यांना पिंजऱ्याच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढले.
त्यानंतर पशुसंवर्धन विभाग (कुडाळ) चे सहाय्यक आयुक्त डॉ सुधाकर ठाकूर यांनी शवविच्छेदन केले. पाण्यात बुडून श्वास गुदमरून सदर बछडयांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मृत बछड्यांचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री केली. नंतर त्यां दोघांना शासकीय जागेय दहन करण्यात आले.
उपवनसंरक्षक (सावंतवाडी) एस. एन. रेड्डी, मानद वन्यजीव रक्षक नागेश दफ्तरदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (कुडाळ) तथा सहाय्यक वनसंरक्षक (सावंतवाडी ) अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, सिंधुदुर्ग वाईल्ड लाईफ इमरजन्सी रेस्क्यू संस्थेचे अनिल गावडे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी पुढील सदर कार्यवाही केली.

कुडाळ / प्रतिनिधी

Related Stories

चिपळुणातील महामार्ग उड्डाण पूल कामास प्रारंभ

Patil_p

काजू बीला 115 रुपये दर निश्चित

NIKHIL_N

हापूसच्या मदतीला धावली पोस्टाची ‘मेलमोटार’

NIKHIL_N

लसीकरण ऑफलाईन सुरू करा!

NIKHIL_N

बाहेरून आलेल्यांचा सर्व्हे होणार!

NIKHIL_N

69 कामे बहुमताने नामंजूर करत सत्ताधाऱयांचा सेनेला शह

Patil_p