इंफाळ : मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात सशस्त्र समूह अरामबाई तेंगगोलच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या उग्रवाद्यांकडून शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. कंगाबाम लेनिन सिंह आणि तोइजम शांतिकिशोर अशी या आरोपींची नावे आहेत. दोघांनाही बुधवारी रात्री उशिरा नंबुल मापल भागात पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक इंसास रायफल अणि 16 काडतुसे, पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे मणिपूरमध्ये 5 कुकी-जो उग्रवाद्यांना अटक झाल्यामुळे संबंधित समुदाय नाराज झाला आहे. भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह शहरात या उग्रवाद्यांच्या मुक्ततेची मागणी करत मोठी निदर्शने करण्यात आली आहेत. निदर्शकांनी स्वतंत्र प्रशासन, कुकी-जो उग्रवाद्यांची मुक्तता आणि मणिपूरपासून पूर्णपणे वेगळे करण्याची मागणी केली आहे.
Previous Articleमनीष वर्मा यांची संजद महासचिवपदी नियुक्ती
Next Article गुहेत मिळाले 51 हजार वर्षे जुने चित्र
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.