Tarun Bharat

शिवसेनेचे आणखी 2 आमदार फुटणार; संदिपान भुमरेंचा गौप्यस्फोट

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

शिंदे गटाने बंडखोरी करत शिवसेनेतील 40 आमदार गळाला लावले. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाकडे दोन तृतीआंशपेक्षा जास्त आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांची संख्या आधीच कमी असून, आता त्यांच्या गटातील आणखी दोन आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे.

भुमरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन आमदार लवकरच बाहेर पडून शिंदेसेनेत येणार आहेत. शिवसेना सोडून मी शिंदे गटात सामील झालो. मी राज्यमंत्रिपद मागितले होते, पण मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. शिंदेंबरोबर जाताना पद गेले तर काय होईल, याचा विचार मी केला नव्हता. उद्धव ठाकरे आता कुणालाही भेटण्यासाठी तयार आहे. पण अडीच वर्ष त्यांना आम्हाला भेटायला वेळ नव्हता’, अशी टीकाही त्यांनी केली.

अधिक वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष

दरम्यान, आतापर्यंतच्या इतिहासातील शिंदे गटाची बंडखोरी ही सर्वात मोठी होती. या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे गटाने आधीच शिवसेनेचे 40 आमदार फोडले आता आणखी दोन आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोट भुमरे यांनी केला. त्यामुळे हे दोन आमदार नेमके कोण? यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

तर एमपीएससी विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन – सदाभाऊ खोत

Archana Banage

सातारा : कोरोना बांधितामुळे अंगापूर हादरले, एकाच दिवसात १६ पॉझिटिव्ह

Archana Banage

“बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता”

Archana Banage

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका: पालकमंत्री जयंत पाटील

Archana Banage

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे सावंतवाडीशी ऋणानुबंध

Anuja Kudatarkar

छत्रपतींचा शिवसेनेकडून अपमान, महाराष्ट्राला उत्तर द्या-प्रवीण दरेकर

Archana Banage