अनगोळ परिसरात हळहळ
प्रतिनिधी /बेळगाव
भांदूर गल्ली, अनगोळ येथील शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन महिलांचे अर्ध्या तासाच्या अंतराने निधन झाले आहे. त्यांच्यावर एकाचवेळी अनगोळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भांदूर गल्ली येथील तुळसाबाई हावाण्णा कलखांबकर (वय 85) यांचे पहाटे 5.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यापाठोपाठ त्यांच्याशेजारी राहणाऱ्या शांता रामा कंग्राळकर (वय 76) यांचेदेखील पहाटे 6 वाजता निधन झाले. एकाच दिवशी एकाच गल्लीतील दोन शेजारी महिलांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तुळसाबाई कलखांबकर यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे तर शांता कंग्राळकर यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.