प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून रोडावलेली कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढती आहे. सलग तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शनिवारी बेळगाव तालुक्मयातील आणखी दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 166 वर पोहोचली आहे. यापैकी 99 हजार 150 जणांनी कोरोनावर मात केली असून 13 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 1268 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिह्यातील 20 लाख 51 हजार 945 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 19 लाख 45 हजार 200 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजधानी बेंगळूरसह राज्यातील वेगवेगळय़ा जिह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे.