बांदा/प्रतिनिधी-
मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी महिंद्रा कंपनीची कार उलटून गाडीतील २ व्यक्ती ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली. सदरच्या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला नेणारी अॅम्बुलन्स जळाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.