Tarun Bharat

दापोलीत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याचा हल्ला

साखळोली शिवाजीनगर येथे दिवसाढवळ्या घडली घटना

Advertisements

दापोली/प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथे भर दिवसा दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात दोन मोटरस्वार जखमी झाले असून त्यांच्यावर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथील ऋषभ दाभोळकर (वय- 26 रा. असोंड) व अमर लांजेकर (वय 26 रा. शिवाजीनगर) हे दोघे मोटरसायकल घेऊन चिंचमाळ या मार्गावरून दापोलीकडे येत होते. त्याचवेळी लगतच्या झाडीतून बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर उडी घेतली. उडी मारली ती गाडीवर असणाऱ्या दाभोळकर व लांजेकर यांच्या पायावर बसली. मात्र आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या जंगलात पळून गेला. यात लांजेकर व दाभोळकर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायावर बिबट्याने पंजाचा जोरदार वार करत त्यांना जखमी केले आहे.

या घटनेची माहिती मिळतात दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, वनपाल एस. एस. सावंत, ताडील वनरक्षक श्रीम. भिलारे बांधतीवरे वनरक्षक गणपत जळणे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Related Stories

तर आठवडा बाजारातील व्यापाऱयांवर कारवाईचा बडगा

Patil_p

Ratnagiri : पोलिसांना चकवा देऊन आरोपीचे जंगलात पलायन

Abhijeet Khandekar

चिपळुणात पुन्हा लॉकडाऊन अशक्य

Patil_p

रिफायनरीसाठी व्यापारी संघाचे शासनाला निवेदन

Patil_p

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी ७३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

विहिरीत पडलेल्या वयोवृद्ध महिलेला तरुणांनी वाचवले

Patil_p
error: Content is protected !!