Tarun Bharat

सांबराची शिंगे वाहतूक करणारे दोघे अटकेत

चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुरामनजीक सवतसडा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून सांबराची शिंगे वाहतूक करणाऱया दोघांना शनिवारी जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून दोन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सचिन रामचंद्र घोसाळकर (52), राकेश कृष्णा पिंपळकर (41, दोघेही बोरज, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेला काही व्यक्ती वन्यजीवी प्राण्यांचे अवयव विक्रीकरिता चिपळूण येथे घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम येथील सवतसडानजीक सापळा रचला. यावेळी आलेल्या एका परजिह्यातील वाहनाची चौकशी करत तपासणी केली असता त्यामध्ये दोन सांबरांची भरीव शिंगे आढळली. याप्रकरणी सचिन घोसाळकर व राकेश पिंपळकर या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 2 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर, पोलीस हवालदार भागणे, झोरे, डोमणे, पालकर, कांबळे, परि. पोलीस उपनिरीक्षक पाटील, वनरक्षक कृष्णा इरमाले आदीच्या पथकाने केली. दरम्यान, ही दोन्ही शिंगे जुनी असल्याचे बोलले जात असून ती नेमकी कोणाला विकली जात होती, यात रॅकेट आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

परप्रांतीय नौकेला आठ लाखाचा दंड

NIKHIL_N

कामावर हजर झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईतून सूट

Patil_p

पार्किंग वादातून दोघांवर चाकू हल्ला

NIKHIL_N

कोरोना बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू

NIKHIL_N

स्वातंत्र्यदिनी दोडामार्गात तब्बल ११ उपोषणे

Anuja Kudatarkar

हेदुळ, ओवळियेतही अतिप्राचिन कातळशिल्पे

NIKHIL_N