Tarun Bharat

परसात गांजा पिकविणाऱया दोघा जणांना अटक

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

आपल्या परसात गांजा पिकविणाऱया दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून गांजाची चार झाडे जप्त केली आहेत. काकती पोलिसांनी सुळगा-हिंडलगा येथे शुक्रवारी ही कारवाई केली आहे.

परशराम भरमा नरोटी (वय 42), पिराजी वैजू नरोटी (वय 29, दोघेही रा. सुळगा-हिंडलगा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

परशराम राहात असलेल्या घराच्या परसात गांजाची चार झाडे पिकविली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून 3 किलो 158 ग्रॅम गांजा जप्त केला. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 20 (ए), 20 (बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

प्रशासकांची धुरा जिल्हाधिकाऱयांकडे

Patil_p

खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग

Amit Kulkarni

शिक्षकाच्या बदलीसाठी दोन तास ठिय्या आंदोलन

mithun mane

पोलीस व्हॅन ठरतेय दुकानदारांना अडचणीची

Amit Kulkarni

शिकाऱयाच्या घरावर वनाधिकाऱयांचा छापा

Patil_p

येळ्ळूर येथे प्राथमिक शाळेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

Patil_p
error: Content is protected !!