रायबाग पोलिसांची कारवाई : 9 किलो गांजा जप्त
प्रतिनिधी/बेळगाव
रायबाग तालुक्मयातील बोमनाळ व बिरनाळ येथे शेतात गांजा पिकविणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सी. जे. सारापुरे, आर. बी. खानापुरे, एस. वाय. तळवार, एस. एस. सासनूर, सी. बी. पाटील, ओ. एस. वडेयर, बी. सी. कांबळे, एस. बी. सैदापूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
बोमनाळ व बिरनाळ येथील दोघा शेतकऱयांनी उसाच्या मळय़ात गांजा पिकविल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून कच्चा गांजा जप्त केला. पोलिसांनी 9 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत 2 लाख रुपये होते.